संस्कृती ‘जोडणारी’ असली पाहिजे, ‘तोडणारी’ नाही. विशिष्ट संस्कृतीमुळे समाजात गट पडू नयेत, दुफळी माजू नये, यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे
संस्कृतीतील सर्वच गोष्टी जीवन फुलवणार्या, जीवन संवर्धक किंवा जीवनाला अनुकूल असतातच असे नव्हे. जसे भौतिक जीवन एकाच वेळी प्रकाशकिरणांनी आणि अंधारमय छायांनी भरलेले असते, तसे संस्कृतीचे असते. काही संस्कृतीत जशा तारक पद्धती, तशाच मारक पद्धती एकत्र असू शकतात. म्हणून संस्कृतीची फक्त वाखाणणी करत बसून संस्कृतीला हरभर्याच्या झाडावर चढवण्याचे प्रयत्न सतर्कतेने टाळावेत.......